र्शिर्डी येथील साईश विनोद गोंदकर इयत्ता दहावी शिकणारा मुलगा गेल्या 1 ते दीड वर्षांपासून 'गरज गरजवंतांची' हे ब्रीद वाक्य घेऊन शहरी भागातून घरोघरी जाऊन गोळ्या औषधे, कपडे, व शालेय साहित्य गोळा करून ती गरीब व गरजवंत पर्यंत पोहचली आहे. जसे की वीट भट्टी कामगार, ऊस तोडणी कामगार, रेल्वे रूळ लगत राहत असलेले गरीब व त्यांची मुले यांना कपडे व शालेय वस्तु दिले. तसेच जमा केलेली औषधे सरकारी ग्रामीण रुग्णालय येथे पोहच करून तेथील डॉक्टर यांना भेटून ती औषधे गरजवंत यांना मोफत देण्याची विनंती केली.
संपुर्ण covid काळात साईश ने हे सामाजिक कार्य सुरू ठेवले हे बघून त्याचे अमेरिका व कॅनडा येथील मित्र यांनी सुद्धा त्यास covid संदर्भात लागणारी औषधे देऊ केली. ती औषधे साईश ने लोणी येथिल कोविड केअर सेंटर,यासह सरकारी ग्रामीण रुग्णालय अस्तगाव, राहाता, दाढ, पुणतांबा, को-हाळे, वाकडी, सावळविहिर इ. रुग्नालयात पोहच केली.
साईश करत असलेल्या सामाजिक कामाची दखल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली व रेनबो इंटरनॅशनल स्कुल, जेऊरकुंभारी येथे त्यास सन्मानित करण्यात आले आहे.
आज पर्यंत साईश जवळपास 3500 गरीब व गरजवंतां पर्यंत पोहचला आहे. त्याची अशी इच्छा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातून 2 तास हे सामाजिक कामास दिल्यास आपल्याला समाधान लाभेल. सामाजिक काम कुठलेही असो जसे की रुग्णांना मदत सेवा, शेतमजुर मुलांना मदत, निसर्ग सेवा इ. नुकतेच त्याने www.needforneedy.org हे संकेत स्थळ स्थापन केले आहे. जगभरातून त्यावर नोंदणी होत आहे. आपण ही त्यावर नोंदणी करावी व साईश चा उपक्रम पुढे चालू ठेवावा ही विनंती केली.
हा कार्यक्रम रेनबो इंटरनॅशनल स्कूल,जेऊर कुंभारी येथे पार पडला.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, सर्टिफिकेट ऑफ कंमिटमेंट चा पुरस्कार महेश वैद्य समन्वयक वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व मनिषा वैद्य सदस्य वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या हस्ते साईश विनोद गोंदकर यास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास संजय नागरे व आनंद दगडे स्कूल ट्रस्टी, आकाश नागरे,डायरेक्टर श्रीमती शैला झुंझारराव, प्राचार्या. श्री सोमनाथ सोनवणे उप प्राचार्य, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी व प्रमुख पाहुणे सागर कुलकर्णी व अजित पारख उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार कैलास ढमाले यांनी केले. शिक्षक दिनी कार्यक्रम पार पडला त्यामुळे साईशने आपल्या आभार व्यक्त करताना संपुर्ण जगभरातील विद्यार्थ्यांनी आठवड्यातून 2 तास समाज सेवा केल्यास आत्मिक समाधान लाभते व मिळालेला पुरस्कार सर्व शिक्षकांना समर्पित करत आहे.असे मत व्यक्त केले
0 Comments